डॉक्टर दिनानिमित्त डॉक्टरांचा सत्कार


। उरण । वार्ताहर ।
उरण काँग्रेसने डॉक्टर दिनाचे औचित्य साधत उरण मधील डॉक्टरांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कोरोनाच्या काळात उरणमधील डॉक्टरांनी जीवावर उदार होऊन उरणकरांना सेवा दिली आहे व यापुढेही देत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल डॉक्टर दिनाचे औचित्य साधून उरणमधील डॉक्टरांचा सत्कार उरण काँग्रेसच्यावतीने आयोजित करण्यात आला होता.

रायगड पोलिसांचं लक्ष कुठेयं?

उरणमधील डॉक्टरांनी कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता येथील जनतेची सेवा केली. त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव होणे उचित होते.ते काम उरण काँग्रेस कमिटीने करून दाखविले.त्यांच्या बरोबरीने मी व माझे सहकारी यांनी अनेक गरजूंना अन्नधान्य पुरविण्याचे कार्य केले असल्याचे काँग्रेसचे जेष्ठ नेते महेंद्र घरत यांनी सांगितले. जगात डॉक्टर व शिक्षकांना दैवत मानले जात असल्याचे सांगत यापुढे दरवर्षी डॉक्टर दिनी उरण काँग्रेसतर्फे डॉक्टरांचा सत्कार करण्यात येईल असा विश्‍वास घरत यांनी व्यक्त केला.

यावेळी उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विकास मोरे ,जे. डी. जोशी यांनी मार्गदर्शन केले. मान्यवरांच्या हस्ते उपस्थित डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी महेंद्र ठाकूर,मिलिंद पाडगावकर,मार्तंड नाखवा,भालचंद्र घरत,यशवंत म्हात्रे,कमलाकर घरत,श्रेयस घरत,गणेश पाटील,उमेश भोईर,संजय ठाकूर,अकलाख शिलोत्री, गोपीनाथ मांडलेकर,अशोक ठाकूर, गुफरान तुंगरकर,सदानंद पाटील, रेखा घरत, अफशा मुकरी, निर्मला पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version