वात्सल्य समितीतर्फे कागदपत्र तपासणी शिबीर उत्साहात

। पेण । वार्ताहर ।
कोव्हिड-19 या संसर्गजन्य आजारामुळे अनाथ झालेली बालके तसेच कुंटुबातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन एकल/विधवा झालेल्या महिलांना शासकिय योजनांचा लाभ मिळणे सोईस्कर व्हावे. यासाठी गुरुवारी (दि.16) पेण तहसिल कार्यालयात कागदपत्र तपासणी शिबिर उत्साहात झाले. या शिबीरामध्ये कुंटुबातील सदस्येचे आधारकार्ड, रेशनकार्ड, पॅनकार्ड, बँक खाते पासबुक, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, घरातील सदस्यांचा कोव्हिड-19 ने मुत्यू झालेबाबत मृत्यु प्रमाणपत्र, कोव्हिड रिपोर्ट, इ. आवश्यक ती सर्व कागदपत्रे तपासण्यात आली. श्यावेळी तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी मार्गदर्शन करताना कोरोनात मृत्यूमुखी पडलेल्या नातलगांचे सात्वंन करुन शासन आपल्या पाठीशी सदैव मदतीसाठी उभे असल्याचे सांगितले. तर या कार्यक्रमासाठी नायब तहसिलदार प्रसाद कालेकर, सुनील जाधव, सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकुर, एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या संगिता पाटील, दिपश्री पोटफोडे अदी व्यासपीठावर उपस्थित होते.

वात्सल्य समितीने आयोजित केलेल्या अशा शिबिरांमधून कोव्हिड 19 मुळे दुःखाचा डोंगर कोसळलेल्या भगिनींना आणि अनाथ बालकांना शासनाच्या योजनांसाठी हेलपाटे मारायला लागणार नाहीत. शासन आपल्या दारी या भावनेतून त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येईल.

-संतोष ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते


Exit mobile version