नागावमध्ये कुत्रांचा हैदोस सात ग्रामस्थांना दंश

। रेवदंडा । वार्ताहर ।
नागावमध्ये पिसाळलेल्या कुत्रांनी हैदोस घातला असून सात ग्रामस्थांना दंश केल्याने उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान नागाव ग्रामपंचायतीचे सरपंच निखिल मयेकर यांनी ग्रामस्थांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

ऐन गणेशोत्सवाचे आगमन काही दिवसांवर ठेपले असतानाच नागाव येथील पिसाळलेल्या कुत्रांचा उपद्रव्य वाढला असल्याचे ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. सध्यपिरिस्थितीत ग्रामस्थांनी लहान मुलांची काळजी घ्यावी तसेच पिसाळलेल्या कुत्रांच्या समस्येला अटकाव करण्यासाठी काही माहिती असल्यास त्वरीत ग्रामपंचायतीकडे संपर्क साधावा, असेही सरपंच निखिल मयेकर यांनी ग्रामस्थांसाठी काढलेल्या सुचनापत्रात म्हटले आहे.या समस्येबाबत ग्रामपंचायतीने संबधीताकडे संपर्क साधला असून त्वरीत उपाय योजना करण्याची मागणी केली आहे. यावेळी तातडीने कोणास मदतीची गरज असल्यास 9657456712 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन ग्रामपंचातीतर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version