| चिरनेर | प्रतिनिधी |
लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट व आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात चिरनेर आदिवासी आश्रम शाळेचे सहाय्यक शिक्षक महादेव चंद्रकांत डोईफोडे यांना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे तसेच सहाय्यक शिक्षण प्रकल्प अधिकारी मारुती गायकवाड, लायन्स इंटरनॅशनलचे संजय सूर्यवंशी, जिल्हा शिक्षण समितीचे अध्यक्ष यशवंत चित्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्कृष्ट शिक्षक सन्मान प्रदान करण्यात आला. सदर कार्यक्रम पेण तालुक्यातील पडसरे शाळेत शुक्रवारी (दि.19) रोजी पार पडला. त्यांना प्राप्त झालेल्या पुरस्कारामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.







