। मुंबई । वृत्तसंस्था ।
डोंबिवली येथील 15 वर्षीय सामूहिक बलात्कार प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. पीडितेचा पैसे कमावण्याचे साधन म्हणून मुख्य आरोपी वापर करत होता. त्याने पीडितेला व्हिडिओची धमकी देत मित्रांच्या स्वाधीन केले. महत्त्वाचे म्हणजे तिच्या अब्रूची किंमत 500 रुपये लावल्याची माहितीही समोर आली आहे. डोंबिवली पूर्वेकडील नांदीवली, देसलेपाडा, वडवली, मुरबाड येथील फार्म हाऊस, कोळेगाव, बदलापूर सर्कल याठिकाणी गेली नऊ महिने पीडितेवर अत्याचार करण्यात आले. तिला कधी दारू, हुक्का तर कधी गुंगीचे औषध देऊन अत्याचार केले जात होते. दरम्यान मार्च महिन्यात एका ठिकाणी तिच्यावर तब्बल 15 जणांनी बलात्कार केला. यावेळी मुख्य आरोपीस दोघांनी प्रत्येकी 500 रुपये दिल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले. या घटनेत अटक करण्यात आलेल्या 33 आरोपींपैकी दोन आरोपी अल्पवयीन असून त्यांची रवानगी भिवंडीतील बालसुधारगृहात करण्यात आली आहे.