क्रिकेट सामन्यात डोंबिवली संघ विजेता

। माथेरान । वार्ताहर ।

एक धाव आरोग्यासाठी यासंकल्पनेतून माथेरानमध्ये 50 वर्षावरील गटातील टेनिस बॉल क्रिकेट सामने येथील वीर हुतात्मा भाई कोतवाल क्रीडा संकुल येथे नगराध्यक्ष चषक आयोजित करण्यात आला होता. या सामन्यात डोंबिवली संघाने अजिंक्यपद पटकावले. हे सामने 40 प्लस रायगड क्रिकेट असोसिएशन व ठाणे क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते तर सर्व खेळाडूंच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था प्रसाद सावंत यांनी केली होती.

या क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबई, डोंबिवली, नवीमुंबई, रसायनी, उरण, कर्जत, नेरळ या संघांनी सहभाग घेतला होता. 50 वर्षावरील स्पर्धेत प्रथमच माथेरान 11 संघानेही प्रवेश घेतला होता. सगळीकडे उन्हाचा तडाखा असल्याना माथेरानच्या क्रीडा संकुलात थंड वातावरणात खेळण्याची मजा काय औरच आहे, आम्हाला वाटले होते की गर्मीमुळे खेळणे सोपे जाणार नाही मात्र येथील नयनरम्य वातावरणामुळे आम्ही स्टेडियममध्ये खेळत आहोत असा भास होत होताअसे माथेरान विषयी माथेरान बाहेरील खेळाडूंनी गौरवोद्गार काढले.

40 वर्षावरील रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अण्णा गावडे व 40 वर्षावरील ठाणे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अर्जुन पाटील यांनी माथेरानमध्ये या स्पर्धेचे आयोजन केले होते. या अनोख्या स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रसाद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस रायगड जिल्हा सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष अजय सावंत, माजी नगरसेवक नरेश काळे, कुलदीप जाधव, सागर पाटील, आरपीआय शहराध्यक्ष अनिल गायकवाड, राजेंद्र कदम, 40 प्लसचे आयोजक मुकेश भंडारी,शशी भाऊ,दीपक राणे यांनी सहकार्य केले.

Exit mobile version