| दिल्ली | वृत्तसंस्था |
देशातील जनता महागाईशी दोन हात करत असतानाच केंद्राने बुधवारी 1 मार्चपासून 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 50 रुपयांनी वाढली आहे. दिल्लीत याची किंमत 1103 रुपयांवर गेली आहे. होळीपूर्वी सामान्य जनतेसाठी हा मोठा धक्का आहे. त्याच वेळी, 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 350.50 रुपयांची वाढ करण्यात आहे. दिल्लीत 19 किलोंचा व्यावसायिक सिलिंडर आता 2119.50 रुपयांना मिळेल.
गेल्या वर्षभरात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत झालेल्या बदलाबाबत बोलायचे झाले तर त्यात एकूण 5 वेळा बदल झाला आहे. 22 मार्च 2022 रोजी सिलिंडरची किंमत 50 रुपयांनी वाढल्यानंतर दिल्लीत 899.50 रुपयांवरून 949.50 रुपयांवर पोहोचली होती. 6 जुलै 2022 रोजीही सिलिंडरच्या 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. या वाढीनंतर किंमत 1053 रुपये झाली होती. आता पुन्हा एकदा 50 रुपयांनी वाढ करण्यात आली असून, त्यामुळे सिलिंडरची किंमत 1103 रुपयांवर गेली आहे. म्हणजेच गेल्या वर्षभरात किंमत 203.50 रुपयांनी वाढली आहे.
मुंबईत दूध दर वाढले
मुंबई दूध उत्पादक संघाने दुधाचे नवे दर जाहीर आहे. आता मुंबईत म्हशीचे 1 लिटर दूध विकत घेण्यासाठी आता 85 रुपये मोजावे लागतील. आतापर्यंत एक लिटर म्हशीचे दूध 80 रुपयांना मिळत होते. हे नवीन दर 31 ऑगस्ट 2023 पर्यंत राहणार आहेत. चहा, मिल्कशेक, पनीर, मिठाई इत्यादी दुधापासून तयार करण्यात येणार्या किंमतींमध्ये देखील वाढ होऊ शकते, असा अंदाज लावला आहे. मार्च महिन्यामध्ये होळी, रंगपंचमी यांसारखे सण आहेत. या सणांमध्ये लोक दुधापासून तयार करण्यात आलेले पदार्थ तयार करतात. आता दुधाच्या किंमती वाढल्यानं सर्वसमान्य जनतेच्या खिशाला मोठा फटका बसला आहे.
