| वॉशिंग्टन | वृत्तसंस्था |
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांना हरवून विजय मिळवला आहे. या विजयानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडातील पाम बीच इथं समर्थकांशी संवाद साधला. यावेळी अमेरिकेसाठी हे सुवर्णयुग असल्याचे ते म्हणाले. ट्रम्प म्हणाले की, आतापर्यंतचे हे सर्वात मोठं राजकीय आंदोलन आहे. आम्ही आपल्या देशाला पुन्हा एकदा व्यवस्थित करण्यासाठी मदत करू. देशाला मदतीची गरज आहे. सीमा नीट करू. आज आपण इतिहास घडवला आहे. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत. याआधी 2016 च्या निवडणुकीत त्यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव केला होता. मात्र 2020 च्या निवडणुकीत ज्यो बायडेन यांच्याकडून त्यांना पराभवाचा धक्का बसला होता.