वेणगाव येथील विठ्ठल मंदिरातील दानपेटी फोडली

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत शहराजवळील धाकटे वेणगाव येथे असलेल्या श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात चोरट्यांनी मंदिराची दानपेटी फोडून त्यातील सात हजाराची रक्कम चोरी केल्याची घटना घडली आहे. वेणगाव येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा दरवाजा फोडून चोरी करण्यात आली. वेणगाव ग्रामस्थांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर कर्जत पोलिसांनी मंदिरातील दानपेटीमधील सात हजाराचा ऐवज लंपास केलेल्या गुन्ह्याचा तपास सूरु केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार समीर भोईर करीत आहेत.

Exit mobile version