तरुणाला कृत्रिम पाय दान

| नेरळ । वार्ताहर ।

माथेरान येथील तरुण संदीप गणपत सकपाळ यांनी आपला एक पाय गमावला होता आणि त्यांनतर प्रसाद सावंत यांच्या माध्यमातून मुंबई येथील डॉ. अंकुर शेठ यांनी दोन लाखाची मदत करीत कुत्रिम पाय आणून बसवून दिला आहे. या कृत्रिम पाय मुळे संदीप हा पुन्हा एकदा आपल्या पायावर उभा राहिला आहे.

संदीप सकपाळ या तरुणाचा डावा पाय आजारपणामुळे सुमारे पाच वर्षांपूर्वी गुडघ्याच्या वर कापल्यामुळे 80 टक्के अपंगत्व आले होते. माथेरानमधील आघाडीचा क्रिकेटपटू म्हणून संदीप ओळखला जायचा.

अपंगत्व आल्याने त्या होतकरू खेळाडूचे जगणे देखील मुश्किल होऊन गेलं आहे. मध्यंतरी तात्पुरता एक कृत्रिम पाय त्याला लावला होता.सध्या संदीप चहाची व मक्याच्या कणसाची टपरी चालवून स्वतः मेहनत करून रोजगार उपलब्ध करून आपल्या कुटुंबाची गुजराण करीत आहे. मात्र त्याची हि धावपळ लक्षात घेऊन प्रसाद सावंत यांनी आपल्या मित्रासाठी मुंबई येथील ओळखीचे डॉ. अंकुर शेठ यांच्या सोबत चर्चा केली. त्यानंतर सकपाळ यांच्या डाव्या गुडघ्यावरील अपंगत्व दूर करण्यासाठी जवळपास दोन लाख किंमतीचा लाईट वेट इंपोर्टेड पाय चॅरिटी मार्फत उपलब्ध करून पायाचे अवयव उपलब्ध केले.

Exit mobile version