नमिता नाईक स्मृतीप्रित्यर्थ जेएसएमला एक लाखाची देणगी

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
जेएसएम कॉलेजच्या स्मार्ट क्लासरूमकरिता अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी आपली माजी नगराध्यक्षा स्व. नमिता नाईक यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ जनता शिक्षण मंडळाला एक लाख रुपयांची देणगी दिली.

संस्थेचे माजी अध्यक्ष लोकनेते अ‍ॅड. दत्ता पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून अक्षया प्रशांत नाईक यांनी सदर रकमेचा धनादेश मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. साक्षी पाटील, कार्यवाह गौरव संचालक शैला पाटील, रघुजीराजे आंग्रे, प्रा. डॉ. अनिल पाटील, उपप्राचार्या डॉ. सोनाली पाटील, प्रा. प्राचार्या अ‍ॅड. नीलम हजारे, अ‍ॅड. मानसी म्हात्रे, शाळा समिती सदस्या वृषाली ठोसर, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version