अफवांवर विश्‍वास ठेवू नका; रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अलिबाग तर्फे आवाहन

। अलिबाग । प्रतिनिधी ।

आज मंगळवार दिनांक 19 जुलै 2022 रोजी सर्व वृत्तवाहिन्यांवर येणारी रायगड सहकारी बँकेसंबंधातील बातमी ही मुंबई स्थित सहकारी बँकेंबाबतची आहे. त्याचा रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अलिबाग या बँकेशी काहीही संबंध नाही.

केवळ रायगड या नावातील साधर्म्यामुळे आरडीसीसी बँकेंच्या ग्राहकांनी व ठेवीदारांनी कोणताही गैरसमज करुन घेऊ नये.

कृपया अफवांवर विश्‍वास ठेवू नये व याबाबत ग्राहकांमध्ये अफवा पसरवू नये. तसेच बँकेस सहकार्य करण्याचे आवाहन रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अलिबाग तर्फे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी केली आहे.

Exit mobile version