क्रांतिवीरांना जातीयतेचे लेबल लावू नका- कोळंबे

| नेरळ | प्रतिनिधी |

ज्या क्रांतिवीरांनी स्वातंत्र्यसंग्रामात आपल्या जीवनाची आहुती दिली, ते क्रांतिकारक कोणत्या एका समाजासाठी नाही, तर अखंड भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले. त्यामुळे त्यांना जाती-जातीमध्ये समाविष्ट करून त्यांचे योगदान कमी करू नका, असे आवाहन इतिहास संशोधक वसंत कोळंबे यांनी केले.

स्वातंत्र्यसैनिक गोमाजी रामा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या व्यक्तींना गोमाजी पाटील स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नेरळ बोपले येथे हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक सभागृहात आयोजित समारंभात प्रतिष्ठानच्या वतीने रामकृष्ण भेरे, जैतू मुठोळकर, सुचिता वांजले, चिंतामण वाळकोली, अनिल शिंदे, अविनाश चंदे, चंद्रकांत पष्टे, दिलीप खाटेघरे, मंगेश ठाकूर, कौस्तुभ कस्तुरे, सुनील पाटील, धीरज बैलमारे यांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल, पुष्पगुछ आणि ग्रंथ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना वसंत कोळंबे यांनी एका विशिष्ट समाज किंवा प्रांत हे त्यांचे ध्येय नव्हते. त्यामुळे आपण अशा महान क्रांतिवीरांना जातींचे लेबल लावून संकुचित करू नका, त्यांना जातीच्या चौकटीत बांधिस्त करू नका, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाला कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचे अध्यक्ष सुरेश टोकरे, मराठा सेवा संघांचे अध्यक्ष अनिल भोसले, शिवसेना तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे, कर्जतचे माजी नगरसेवक संतोष पाटील, मुरबाड पं.स. सभापती स्वरा चौधरी, नगरसेविका दीक्षिता वारघडे, तसेच शरद भगत,दीपक घिगे, मयूर पिसेकर, रेखा पाटील, नलिनी साळोखे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत गोंधळी यांच्यासह प्रतिष्ठानचे अध्यक्ष कल्पेश भोईर, सचिव गिरीश कंटे, जिज्ञासा वाचनालयचे प्रदीप मोगरे, वामन गवळी, जयराम गवळी यांनी विशेष मेहनत घेतली.

Exit mobile version