जीवनात सदाचार सोडू नकाः कृष्णा वर्तक

। हमरापूर । प्रतिनिधी |

आपल्या जीवनात आपण कधीही सदाचार सोडू नका असे उद्गार कृष्णा वर्तक यांनी पेण मधील कार्यक्रमात बोलताना काढले. पेण तालुका केंद्रप्रमुख यांची मासिक सभा एन. जे. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली म्हाडा कॉलनी गणेशमंदिराच्या सभागृहात संपन्न झाली. यावेळी सुधाकर पिंगळे, के.डी. चवरकर, गणेश कोळी, ल.जो. ठाकूर, उषा ठाकूर कृष्णा वर्तक यांच्या सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक कार्याचा गौरव केला. वर्तक यांना विविध क्षेत्रात मिळालेले पुरस्कार ही त्यांच्या कार्याची पावती आहे, असे उद्गार अनेकांनी काढले.

कृष्णा वर्तक यांनी मनोगत व्यक्त करताना सर्वांना आवाहन केले की, आपण सर्वांनी हरिचिंतनात राहावे. सत्य, सदाचार, सोडू नका. आपल्या जीवनाचं मांगल्ये व्हावे असे वाटत असेल तर आत्मज्ञानी गुरूला शरण जा. आपल्याला काहीही कमी पडणार नाही, असे सांगितले. शेवटी पसायदानाने या सभेची सांगता करण्यात आली.

Exit mobile version