कोंडगावात मिळणार घरोघरी पाणी

धैर्यशील पाटील यांच्या सहकार्याने योजना मंजूर
| नागोठणे | वार्ताहर |
शासनाने सुरू केलेल्या जलजीवन मिशन उपक्रमांतर्गत हर घर जल या योजनेची संपूर्ण रोहा तालुक्यात चांगल्या प्रकारे सुरुवात झाली आहे. त्यानुसारच पेण-सुधागडचे माजी आ. धैर्यशील पाटील यांच्या सहकार्याने मंजूर झालेल्या नागोठण्याजळील कोंडगाव ग्रामपंचायत हद्दीतील निडी तर्फे नागोठणे येथे जलजीवन मिशन योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन शुक्रवार, दि. 23 डिसेंबरला सकाळी कोंडगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच अनंत वाघ यांच्या हस्ते पार पडले.
या उपक्रमाचाच एक भाग म्हणून धैर्यशील पाटील, माजी जि.प. सभापती नीलिमा पाटील यांच्या सहकार्याने कोंडगाव ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या प्रत्येक घरात 2023 पर्यंत नळाद्वारे पाणी देण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

निडी येथील या भूमिपूजन कार्यक्रमाला कोंडगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य निखिल मढवी, सदस्या प्रणाली मढवी, सदस्य यशवंत शिद, माजी सरपंच धर्मा भोपी, माजी उपसरपंच मधुकर मढवी, उमेश मडवी, गणेश केदारी, मयूर मढवी, तुकाराम शेडगे, मधुकर मढवी, किशोर मढवी, चंद्रकांत मढवी, तुकाराम माने, नितीन राजीवले, जयराम भस्मा, संतोष भोय, हरी शिंगवा आदींसह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Exit mobile version