डॉ. अशोक जाधव पुरस्काराने सन्मानित

। चणेरा । प्रतिनिधी ।

रोह्यातील देवदूत म्हणून ओळखले जाणारे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. अशोक जाधव यांचा देशातील वैद्यकीय क्षेत्रात प्रतिष्ठित व प्रेरणादायी डॉक्टर्स म्हणून दिल्ली येथील ताज पॅलेसमध्ये ‘टाइम्स नाऊ डॉक्टर डे कोन्क्लेव्ह 2024’चा पुरस्कार केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच, डॉ. अशोक जाधव यांच्यासह देशातील एकूण 20 डॉक्टरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावेळी डॉ. जाधव म्हणाले की, हा पुरस्कार मला जो मिळाला आहे. तो संपुर्ण रोहेकरांच्या आशिर्वादाने व सहकार्यामुळे मिळाला आहे. खरं तर देशातील या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या 20 डॉक्टरांमध्ये माझा सन्मान करण्यात आला. त्यामुळे माझ्यासाठी व माझ्या कुटुंबियासाठी हा महत्त्वाचा क्षण असल्यची प्रतिक्रिया डॉ. अशोक जाधव यांनी दिली.

Exit mobile version