| खांब | वार्ताहर |
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर माध्य व उच्च माध्यमिक शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी पतपेढी रोहा तालुका मर्या. या पतपेढीचा 17 वा वर्धापनदिन सोहळा
मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. चेअरमन सुरेश जंगम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या वर्धापनदिन सोहळ्याप्रसंगी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नितिन गोरिवले, संजीव शेरमकर, सुनील थिटे, तात्यासाहेब जाधव, रविंद्र ठाकूर, मुरलीधर कोंजे, बाळू गाडे, देवळेकर, शेळके, शशिकांत महाडिक आदी संचालक व सदस्य उपस्थित होते.