| खोपोली | प्रतिनिधी |
बोरघाटाचे जनक म्हणून ओळखले जाणाऱ्या वीर हुतात्मा शिंग्रोबा देवाचे मंदिर बोरघाटात आहेत. या मंदिराला शेकापचे सांगोला मतदार संघांचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमूख यांनी भेट देत दर्शन घेतले. गेल्या दीडशे वर्षांपूर्वी इंग्रजाना या घाटमाथ्यावरील बोरघाटात रस्ता दाखविणारे शिंग्रोबा धनगर होते. परंतु, त्यांना इंग्रज अधिकाऱ्यांनी गोळ्या घालून ठार मारले. ज्या ठिकाणी शिंग्रोबाना ठार मारले त्या ठिकाणी शिंग्रोबाचे मंदिर बांधले. त्यामुळे मुबंई-पुणे एकमेकांना आज जोडले गेले आहे. त्यामुळे सरकारने मुबंई-पुणे महामार्गावरील तयार करण्यात आलेल्या मिसिंग लिंकला वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर असे नाव द्यावे, अशी मागणी आमदार डॉ. बाबासाहेब देशमूख यांनी मुख्यमंत्रयांकडे केली आहे. यावेळी दत्ताभाऊ शेडगे, नितीन कराडे, विष्णू देशमुख आदिंसह अनेक समाज बांधव उपस्थित होते.





