डॉ. अमलपुरे यांना हिंदी साहित्य पुरस्कार जाहीर


| कोलाड | वार्ताहर |

तटकरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गोवे कोलाड येथील हिंदी विभागाचे प्रमुख डॉ.अमलपुरे सूर्यकांत विश्‍वनाथ यांना महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक विभाग अंतर्गत महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीच्या 2023-24 या वर्षातील हिंदी भाषेच्या प्रचार-प्रचारासाठी व साहित्यातील योगदानासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ‘आचार्य नंददुलारे वाजपेयी पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

डॉ. अमलपुरे 14 वर्षापासून डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालयात हिंदी विभागाचे अध्यापन कार्य करतात. हिंदी साहित्यातील त्यांचे योगदान मोठे आहे. 3 पुस्तके प्रकाशित असून 3 पुस्तकांचे लेखन कार्य पूर्ण झाले आहे. एक कवितासंग्रह प्रकाशित असून 50 कवितेचे लेखन पूर्ण झाले आहे. 50 शोधनिबंध विविध पत्रिकेमधून प्रकाशित असून 50 चर्चासत्रात सहभागी झाले आहेत. मुंबई विद्यापीठ अंतर्गत 1 मायनर रिसर्च पूर्ण केले आहे. भारतातील विविध हिंदी प्रचार-प्रसार करणार्‍या संस्थेचे ते सदस्य म्हणून कार्य करतात. आजपर्यंत 65 विविध क्षेत्रातील पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Exit mobile version