डॉ. जयपाल पाटील यांना ‌‘समाजभूषण‌’ पुरस्कार जाहीर

| कोर्लई | प्रतिनिधी |

शेतकरी व शेतकरी संघटनांना केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती तसेच आपत्ती सुरक्षा विषयक मार्गदर्शन करणारे अलिबाग येथील प्रगतीशील शेतकरी व प्राध्यापक डॉ. जयपाल पाटील यांना सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्याचा ‌‘समाज भूषण राज्यस्तरीय सन्मान 2026‌’ पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे नेते बाबासाहेब पावसे पाटील यांनी ही घोषणा केली. समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. हा पुरस्कार सोहळा रविवार, 5 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता माऊली संकुल सभागृह, सावेडी रोड, अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आला आहे. खासदार भाऊसाहेब वाकचौरे, ग्रामसेवक नेते एकनाथराव ढाकणे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, बबनराव पावसे पाटील व रोहित पवार प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

Exit mobile version