डॉ.मो.स.गोसावी प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम

। बोर्लीपंचतन । वार्ताहर ।

येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्याकला वाणिज्य व विज्ञान महाविदयालयात मंगळवारी थोर शिक्षण तज्ञ, संस्थेचे माजी महासंचालक व सचिव. सर, डॉ. मो. स. गोसावी यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त प्राचार्य, डॉ. श्रीनिवास जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रम प्रसंगी महाविदयालयाचे उपप्राचार्य, व राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख किशोर लहारे यांचे हस्ते सर्व प्रथम प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. तसेच प्रा. लहारे यांनी डॉ. गोसावी सरांचे सखोल चरित्र कथन केले. या कार्यक्रम प्रसंगी त्यांच्या जीवन कार्य व शैक्षणिक योगदाना विषयी एक चित्रफित दाखविण्यात आली. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी,एनएसएस स्वयंसेवक, प्राध्यापक, न्यु मॉडर्न स्कूल, आराठीचे सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सुत्र संचालन एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. नवज्योत जावळेकर यांनी केले, तर आभार प्रा. दिपाली पाठराबे यांनी मानले. या कार्यक्रमास डॉ. निलेश चव्हाण, डॉ. कल्याणी नाझरे, प्रा. पंकज गमे शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली सावंत आणी शिक्षकेतर कर्मचारीवर्ग उपस्थित होते. गोखले शिक्षण संस्थेच्या सचिव, डॉ. दिप्ती देशपांडे व स्थानिक व्यवस्थापन समितीकडून या कार्यक्रमाचे कौतुक करण्यात आले.

Exit mobile version