डॉ. प्रतिभा बागवेंना पुरस्कार


| माथेरान | वार्ताहर |

शिर्डी येथील पुष्पक रिसोर्टमध्ये आयुष ग्लोबल अवॉर्ड कार्यक्रमाचे आयुष इंटरनेशनल मेडिकल असोसिएशन, आयुष ग्लोबल मेडिकल एसोसिएशन तथा विस्तार केंद्र- राजकोट, एमएसएमई टीडीसी (पीपीडीसी) आग्रा, एमएसएमई मंत्रालय भारत सरकार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 29 ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले होते. आयुष चिकित्सा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ. प्रतिभा राजन बागवे यांना आयुष ग्लोबल अवॉर्ड 2023 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून फिल्म स्टार देवदत्त नागे, डॉ. प्रवीण जोशी उपसंचालक तथा विशेष अतिथी प्रणव पांड्या प्रशिक्षण अधिकारी एमएसएमई टीडीसी (पीपीडीसी) आग्रा, एमएसएमई मंत्रालय भारत सरकार तथा अभिनेत्री मिस ऋतुजा बागवे फिल्म स्टार सुयोग गोऱ्हे, कलर टीवी मराठी एक्झुक्यूटिव प्रोड्यूसर शांतनु बोरकर, डॉ. सतीश कराळे चेअरमन एआय एमए. डॉ. नितीनराजे पाटील आदी उपस्थित होते.

Exit mobile version