डॉ. राजेंद्र चांदोरकर यांच्या ‘बाबाची सोनपरी’ व ‘ओ. आर. एस’च्या जाहिरातीला पहिला क्रमांक

। अलिबाग । प्रतिनिधी ।
24जुलै 2022, रविवारी औरंगाबाद येथील मौलाना आझाद रिसर्च सेंटर सभागृहात पार पडलेल्या रोशनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये अलिबाग येथील बालरोगतज्ञ डॉ. राजेंद्र गणपत चांदोरकर यांच्या बाबाची सोनपरी व ओ. आर. एस (जालसंजीवनी) च्या जाहिरातीला पहिल्या क्रमांकाची पारितोषिके मिळाली.

“बाबाची सोनपरी” या व्हिडीओ अल्बमaward

मध्ये एक सामान्य पिता व त्याच्या कन्येची प्रतिकूल परिस्थितीतील केमिस्ट्री सादर करण्याचा प्रयत्न डॉ. राजेंद्र चांदोरकर व त्यांची कन्या कु. संवेदना चांदोरकर यांनी केला आहे. डॉ. चांदोरकर यांनी स्वतः स्वरबद्ध केलेल्या या गीताचे बोल व संगीत मनिष अनसुरकर यांचे असून गाण्याची संकल्पना व दिग्दर्शन सचिन कांबळे यांचं आहे.

डॉ. चांदोरकर यांनी सादर केलेली जलसंजीवनीची ( “ORS Ad” ) जाहिरात सुद्धा पहिला नंबर मिळवून गेली. या जाहिरातीत डॉ. राजेश्री चांदोरकर, डॉ.जुईली टेमकर, सौरभ पाटील, सौ. पोखरणकर, कुमार वेदांत कनगुटकर व डॉ. राजेंद्र चांदोरकर यांच्या भूमिका आहेत. डायरीया/डिझेन्ट्री/डीहायड्रेशन मध्ये जलसंजीवनीचं महत्व हा या जाहिरातीचा गाभा आहे. दिग्दर्शन सचिन कांबळे यांचं आहे आणि वरिल दोन्ही प्रोजेक्ट्सचं संकलन विशाल गायकवाड तसेच छायाचित्रण सुनीत गुरव यांचं आहे.

“Dr Raj Productions” या बॅनर द्वारे निर्मित इंटरनॅशनल ख्यातीचे अवॉर्ड्स मिळालेले हे दोन्ही प्रोजेक्ट्स डॉ. राजेंद्र चांदोरकर यांच्या “dr rajendra chandorkar” या यूट्यूब चॅनेलवर पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.

Exit mobile version