डॉ. रवींद्र भुरकुंडे यांचा गौरव

| माणगाव | प्रतिनिधी |

कातकरी समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक इतिहासात अभिमानाची नोंद करणारी उल्लेखनीय कामगिरी करत डॉ. रवींद्र भुरकुंडे यांनी डॉक्टरेट (विद्या वाचस्पती) पदवी संपादन केली आहे. कातकरी समाजातील पहिले विद्या वाचस्पती होण्याचा मान त्यांनी मिळवून समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. “कातकरी समाजाचा इतिहास : 1975 ते 2006” हा त्यांच्या संशोधन प्रबंधाचा मुख्य विषय असून, कातकरी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व ऐतिहासिक वाटचालीचा सखोल अभ्यास या प्रबंधातून करण्यात आला आहे. या विषयाचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांसाठी हा प्रबंध महत्त्वाचा संदर्भग्रंथ ठरणार असून, भविष्यातील संशोधनासाठी तो अधिकृत व मार्गदर्शक दस्तऐवज म्हणून उपयोगी पडणार असल्याचे जाणकारांनी मत व्यक्त केले आहे. वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र कोकण प्रांत कार्यकारिणीच्यावतीने डॉ. रवींद्र भुरकुंडे यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.

Exit mobile version