डॉ. स्मिता पाटील राज्यपालांच्या हस्ते सन्मानित

| रसायनी | वार्ताहर |
पत्रकार उत्कर्ष समिती, महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या राज्य अध्यक्षा डॉ. स्मिता अजय पाटील यांना महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मेडीक्विन एक्सिलेंस अवॉर्ड राजभवन येथे झालेल्या सन्मान सोहळ्यात प्रदान करण्यात आला. याअगोदरही डॉ. स्मिता अजय पाटील यांना डॉक्टर व्यवसाय सांभाळून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. यावेळी बोलताना डॉ. स्मिता पाटील यांनी हा पुरस्कार पत्रकार उत्कर्ष समिती व महिला उत्कर्ष समितीच्या सर्वच सदस्य व पदाधिकार्‍यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याचा गौरव असल्याचे म्हटले आहे. राज्यपालांच्या हस्ते माझा सन्मान झाल्याने मला भविष्यात अधिक जास्त सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळणार आहे. डॉ. स्मिता पाटील यांना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित केल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version