प्रल्हाद जाधव यांचे अभिवाचन

| अलिबाग | प्रतिनिधी |

पीएनपी कलाविकास मंडळ अंतर्गत ग्रामीण रंगभूमी आयोजित आणि चित्रलेखाताई पाटील पुरस्कृत “अभिवाचन कट्टा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा उपक्रम रविवारी (दि.16) अलिबाग येथील पीएनपी मध्यवर्ती कार्यालयाच्या सभागृहात पार पडला. यावेळी प्रख्यात लेखक प्रल्हाद जाधव यांनी अभिवाचन केले. स्वलिखीत “एका दुर्मिळ माशाचा जीव वाचवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या एका शाळकरी मुलाच्या चित्रपट कथेचे” अभिवाचन केले. त्यांच्या अभिवाचनाने उपस्थित रसिक प्रेक्षक आणि मान्यवर मंत्रमुग्ध झाले. तसेच, नवोदित लेखकांना प्रल्हाद जाधव यांनी लेखन बाबत मार्गदर्शन केले.

यावेळी अलिबाग मधील जेष्ठ रंगकर्मी किशोर म्हात्रे, सुनील ठोंबरे, डॉ. वाझे, संतोष बोंद्रे, गुणवंत पाटील, निशिकांत कोळसे, मिलिंद घाडगे, गबाजी गिते, कैलास पिंगळे, विजय म्हात्रे, प्रमोद पाटील, जितेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान, पीएनपी कलाविकास मंडळाचे उपाध्यक्ष विक्रांत वार्डे यांनी प्रास्ताविक केले. ग्रामीण रंगभूमीचे अध्यक्ष राजन पांचाळ यांनी उपस्थितिथांचे आभार मानले. ग्रामीण रंगभूमीचे उपाध्यक्ष देवेंद्र केळूसकर यांनी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. या संपुर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन ग्रामीण रंगभूमीचे सचिव प्रतिक पानकर यांने केले. दरम्यान, सर्व रसिक प्रेक्षक आणि मान्यवरांंकडूून आयोजंकाचे कौतुक करण्यात आले.

Exit mobile version