भीषण अपघातात चालकाचा मृत्यू

। पनवेल । वार्ताहर ।
पुणे-मुंबई महामार्गावरील मुंबई लेनवर खांदेश्‍वर पोलीस ठाणे हद्दीत टाटा ट्रकचा शुक्रवारी पहाटे अपघात झाला. यामध्ये चालकाचा मृत्यू झाला. टाटा ट्रक क्रमांक एमएच 04 जेयु 3307 क्रमांकवरील चालक रोहिदास चव्हाण (वय 31 वर्ष, रा नांदगाव नाशिक) हा त्याच्या ताब्यातील वाहन पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेने मुंबई बाजूकडे जात असताना त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने पुढे तिसर्‍या लेनमध्ये असलेल्या समीर अन्सारी (वय 38 वर्ष राठी वापी सिलवासा, गाजीपुर) यांच्या ट्रक क्र. डीएन 09 आर 9338 ला पाठीमागून जोरात ठोकर मारल्याने तो गंभीर जखमी झाला.

यामध्ये त्याचा मृत्यू झाला. यावेळी महामार्ग पोलीस केंद्राचे पळस्पे मोबाईल स्टाफ यांच्यासह खांदेश्‍वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पाटील यांचे सहकारी तसेच आयआरबीचे डॉक्टर व स्टाफ उपस्थित होते.

Exit mobile version