| उरण | वार्ताहर |
नारळीपौर्णिमा सण करंजा गावातील द्रोणागिरी हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करून, समुद्राला सोन्याचा प्रतिकृती असलेला नारळ अर्पण करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यंदाचे 20 वे वर्षे असल्याचे समजते.
समुद्र किनारी असलेल्या करंजा गावातील मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या द्रोणागिरी हायस्कूलमध्ये नारळी पौर्णिमा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थी कोळी वेशभूषेत नटून थटून आले होते. यावेळी सोन्याच्या नारळाची प्रतिकृती बनविण्यात आली होती. त्याची विधीवत पूजाअर्चा करून वाजतगाजत लेझीम पथक व द्रोणागिरी माता ब्रास बँडच्या साह्याने मिरवणूक काढण्यात आली होती.
सदर मिरवणूक शाळेतून निघून ती थेट करंजा बंदरावर आणण्यात आली. यानंतर सोन्याच्या नारळाची प्रतिकृती असलेले नारळ खोल समुद्रात नेऊन विसर्जन करण्यात आले. यावेळी शाळकरी विद्यार्थी, शिक्षक व सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.