काशीद किनारी पर्यटकाचा बुडून मुत्यू

दोन आठवड्यातील दुसरी घटना

| आगरदांडा | वार्ताहर |

काशीद समुद्रात पुणे येथून आलेला पर्यटकाचा बुडून मुत्यू झाला. सदरची घटना रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली. दोन आठवड्यातील हि दुसरी घटना घडल्याने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरनीवर आला आहे. मुद्दसर इम्तियाज शेख (37) असे मृत पर्यटकाचे नाव आहे.

पुणे येथून 16 जणांचा समूह काशीद येथे पर्यटनासाठी शनिवारी आला होता. काशीद येथे वस्ती केल्यानंतर रविवारी सकाळी काशीद समुद्र किनारी पर्यटनासाठी गेलेे. यातील काही जण पोहण्यासाठी पाण्यात उतरले. यातील इम्तियाज शेख (रा.पुणे-चिंचवड, रोनक रेसिडेन्सी) हे देखील होते. पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडले. त्यांच्या मृत्यूमुळे नातेवाईकावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Exit mobile version