तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाचा पुढाकार
| पनवेल ग्रामीण | प्रतिनिधी ।
शहरातील युवक आणि समाजाला अमली पदार्थ, मद्य, तंबाखू तसेच इतर व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी कळंबोली पोलिसांकडून “नशा मुक्त शहर, कळंबोली” या जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत व्यसनमुक्त समाज निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन, समुपदेशन, माहितीपर कार्यक्रम तसेच युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. समाजातील प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सहभागी होऊन व्यसनमुक्त समाज घडविण्यास सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 16 मे 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता सेक्टर 16, बस डेपो, रोडपाली येथे आयोजित करण्यात आला आहे. या अभियानाचे आयोजन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते (कळंबोली पोलीस ठाणे) आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे (अमली पदार्थ विरोधी कक्ष, नवी मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.







