| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल रेल्वे स्टेशन रोडवरील साईबाबा मंदिरासमोरील भगत चाळ परिसरात अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगणाऱ्या 2 जणांना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 लाख 61 हजार रुपये किमतीची मुद्देमाल हस्तगत केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सागर जोसेफ (25) आणि गणेश जोसेफ (21) हे पनवेल रेल्वे स्टेशन रोडवरील साईबाबा मंदिरासमोरील भगत चाळ परिसरात अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाणे स.पो.नि. प्रविण फडतरे, पो.हवा. संदेश म्हात्रे, पो.हवा. अमोल पाटील, पो.ना. मिथुन भोसले, पो.शि. किरण कराड, पो.शि. सचिन कोर, पो. शि विशाल दुधे आदींच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून 1 लाख 9 हजार 900 रुपये किंमतीचा 4.396 किलो वजनाचा गांजा, रोख रक्कम आणि आयफोन मोबाईल असा एकूण 1 लाख 61 हजार रुपये किमतीची मुद्देमाल हस्तगत केला आहे.







