नशेत मुलीने केली आत्महत्या, मैत्रीण दारुच्या नशेत बेशुद्ध

| पुणे | प्रतिनिधी |

पुण्यातील येरवडा परिसरात दोन अल्पवयीन तरुणींच राहत्या घरात दारुपार्टी केली. मद्यप्राशन केल्यावर एका तरुणीने आत्महत्या दुसरी बेशुद्ध अवस्थेत आढळली. तरुणीच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. या घटनेचा पोलीस तपास सुरू आहे. पार्टी करणाऱ्या मुली अल्पवयीन असल्याची माहिती मिळत आहे. आत्महत्या केलेल्या मुलीचे वय 16 आहे. येरवडा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुणी 11 वी मध्ये असून येरवडा भागात होती. सोमवारी (दि.15) सायंकाळी ती आणि तिच्या एका मैत्रिणीने आई भाजी आणण्यासाठी गेली असता घरात दारू पार्टी करायचे ठरवले आणि मद्यप्राशन केले. दरम्यान, मयत तरुणीच्या मैत्रिणीने त्याच भागात राहणाऱ्या एका तरुणाला रात्री 8 वाजता बोलावले होते. तो तरुण घरी पोहचताच त्याने एक तरुणी ओढणी वापरून गळफास लावलेल्या अवस्थेत त्याने पाहिले. यानंतर त्यानेच तिच्या आईला बोलवून आणले. त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्यापुर्वीच तिचा मृत्यू झालेला होता. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

Exit mobile version