महामार्गावरील खड्ड्यांमुळे व्यावसायिकांवर उपासमार

| गोवे-कोलाड | वार्ताहर |

मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. याचा परिणाम व्यवसायावर झाला असून, महामार्गावरील व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवासी रेल्वेने प्रवास करीत आहेत. या महामार्गावर असणारी पर्यटन स्थळे व धबधबे यांच्याकडेही नागरिकांनी पाठ फिरवली असल्यामुळे याचा परिणाम पानटपरी, हॉटेल व्यावसायिक व इतर छोटे-मोठे व्यावसायिकांच्या धंद्यावर झाला आहे. महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला 2010 साली सुरवात करण्यात आली.तेव्हा कोणत्याही व्यावसायिकांना क्षणाचा वेळ न देता दुकाने, पानटपऱ्या, हॉटेल पडण्यात आले. काहींना तर त्यांच्या दुकानातील सामानही बाहेर काढून दिले नाही. शिवाय उद्ध्वस्त झालेल्या व्यावसायिकांना दुसरी जागा देण्यात येईल असे सांगण्यात आले; परंतु अद्याप ती मिळाली नाही. दरम्यान, महामार्गाच्या दुरवस्थेमुळे प्रवासी बाहेर पडत नसल्याने व्यावसायिकांच्या धंद्यावर परिणाम झाला आहे.

व्यावसायिकांना ग्राहकांची वाट पाहता बसावे लागत आहे. यामुळे दिवसाची मजुरी सुटत नाही. यामुळे उपासमारीची वेळ आली असून सर्व व्यवसाय सुरळीत होण्यासाठी गणेशोत्सवापूर्वी महामार्गाचे काम पूर्ण करावे.

पांडुरंग गायकर, हॉटेल व्यावसायिक
Exit mobile version