दुलीप ट्रॉफी आधीच ‘बी’ आणि ‘सी‘ संघांत उलथापालथ

दोन खेळाडूंची माघार; तर एकाचं कारण अस्पष्ट

। मुंबई । वृत्तसंस्था ।

दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेसाठी चार संघ सज्ज झाले आहेत. बीसीसीआयने या स्पर्धेसाठी इंडिया-ए, इंडिया-बी, इंडिया-सी आणि इंडिया-डी अशी वर्गवारी केली आहे. इंडिया-ए संघाची जबाबदारी शुबमन गिलकडे, इंडिया-बी संघाची जबाबदारी अभिमन्यू ईश्‍वरनकडे, इंडिया-सी संघाची जबाबदारी ऋतुराज गायकवाडकडे, तर इंडिया-डी संघाची जबाबदारी श्रेयस अय्यरकडे आहे.

अभिमन्यू ईश्‍वरनच्या संघाला धक्का बसला आहे. कारण त्याच्या संघातून दोन दिग्गज खेळाडू बाहेर पडले आहेत. एकाचं कारण स्पष्ट आहे, तर एकाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. ऋतुराज गायकवाडच्या संघालाही गोलंदाजीत फटका बसला आहे. स्पर्धेच्या दहा दिवस आधी माघार घेणार्‍या खेळाडूंमध्ये मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि रवींद्र जडेजाचा समावेश आहे.

मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक आजारी आहेत. दोघांना सप्टेंबर महिन्यात होणार्‍या दुलीप ट्रॉफीतून रिलीज केलं आहे. त्यांच्या जागी वेगवान गोलंदाज नवदीप सैनी आणि पुडुचेरीचा वेगवान गोलंदाज गौरव यादव यांचा समावेश आहे.

Exit mobile version