। कॅरेबियन । वृत्तसंस्था ।
भारताची स्टार बॅटर जेमिमान रॉड्रिग्स ही महिला कॅरेबियन लीगमधील त्रिनबागो नाईट रायडर्स संघाचा भाग आहे. सेमी फायनलमध्ये तिने संघाकडून जबरदस्त कामगिरी केली. वेस्ट इंडिजमधील कॅरेबियन लीगमध्ये झालेल्या बारबाडोस रॉयल्स संघाविरुद्धच्या सामन्यात जेमिमान रॉड्रिग्जचा स्फोटक अंदाज पाहायला मिळाला. तिनं केलेल्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर त्रिनबागो नाईट रायडर्स संघाने 4 विकेट्स राखून हा सामान जिंकला. या विजयासह त्यांनी फायलमधील आपली जागा पक्की केली असून जेतेपदापासून हा संघ आता एक पाऊल दूर आहे.
बारबाडोस संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित 20 षटकात 7 बाद 130 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना नाईट रायडर्सच्या संघाने 19.4 षटकात 6 विकेट्सच्या मोबदल्या टार्गेट पार केले. जेमिमा रॉड्रिग्स हिने या सामन्यात 50 चेंडूत नाबाद 59 धावांची खेळी केली. तिच्या या कडक खेळीत 4 खणखणीत चौकारांचा समावेश होता.
मुंबईच्या पोरीने एकहाती किल्ला लढवला. तिच्याशिवाय अन्य कोणत्याही बॅटरला 20 धावांपेक्षा अधिक धावा करता आल्या नाही. आता फायनलमध्येही संघाला तिच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.