। उरण । वार्ताहर ।
उरण एज्युकेशन सोसायटी लिटिल सिड्स इंटरनॅशनल प्री-स्कूल मध्ये शनिवारी (दि.12) दसरा उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी दसर्याच्या दिवशी पूर्व प्राथमिक विभागातील विदयार्थ्यांना पाटीवर काढलेल्या सरस्वतीच्या चित्रावर फुले व हळदीकुंकु वाहून पाटीपूजा करण्यासाठी सांगितले जाते. कार्यक्रमाच्या सुरवातीला पूर्व प्राथमिक विभागातील एका शिक्षिकेने दसरा का साजरा केला जातो, याची माहिती सांगितली. यानंतर संगीत शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली एक सुंदरशी सरस्वती वंदना माध्यमिक विभागाच्या विद्यार्थांनी सादर केली. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतर्फे विद्यार्थी व पालकांना आपट्याच्या पानाच्या प्रतिकृती देऊन उरण एज्युकेशन सोसायटीस् लिटिल सिड्स इंटरनॅशनल प्री-स्कूल मध्ये दसरा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. मिनाक्षी गुप्ता यांच्यासमवेत स्कूल व ज्यु. कॉलेजच्या प्राचार्या, सिनिअर कॉलेजच्या विभाग प्रमुख तसेच माध्यमिक, प्राथमिक, पूर्व प्राथमिक विभागातील पर्यवेक्षिका, समन्वयक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते.
प्री-स्कूलमध्ये दसरा उत्साहात
