पोटासाठी तारेवरची कसरत

। नेरळ । वार्ताहर ।

कर्जत शहरात रस्त्याच्या बाजूला पोटासाठी तारेवरची कसरत करून दोन पैसे कमावत आहेत. अशावेळी रस्त्याच्या बाजूला डोंबारीचे खेळ करणार्‍यांच्या जीविताची काळजी कोण घेणार? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

वेगवेगळ्या शहरात डोंबारीचे खेळ सुरु असल्याचे दिसतात. ते रस्त्याच्या बाजूला काठ्या उभ्या करुन रस्त्याच्या बाजूला डोंबारी खेळ सुरु करतात. मात्र त्यांचे हे खेळ अगदी रस्त्याच्या बाजूला सुरु असतात. त्या रस्त्यामधून शेकडो वाहने ये-जा करीत असतात. त्यामुळे त्यांच्या जीविताचा प्रश्‍न निर्माण होत आहे. हे खेळ करणार्‍यांना एक सुरक्षित जागा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

Exit mobile version