सुपारी संघाच्या चेअरमनपदाची उत्सुकता वाढली

16 जानेवारीला होणार निवडणूक

| आगरदांडा | प्रतिनिधी |

पाच कोटींपेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असणार्‍या मुरुड तालुक्यातील नामांकित मुरुड तालुका सुपारी खरेदी-विक्री संघाची निवडणूक 5 जानेवारी रोजी झाली होती. सहा जागा या बिनविरोध आल्या आहेत. त्यामुळे उर्वरित राहिलेल्या 11 जागांसाठी मतदान होऊन बागायतदारांनी परिवर्तन पॅनलला बहुमत दिल्याने आता या गटाचा चेअरमन होणार आहे.

सोमवार (दि. 16) सकाळी 11 ते 2 या कालावधीत चेअरमन निवडीचा कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती सहाय्य्क निंबंधक श्रीकांत पाटील यांनी पत्रकारांना दिली आहे. त्यामुळे आता चेअरमन निवडीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात होणार असून, उत्सुकता वाढली आहे.

सहकारी तत्त्वावर स्थापन झालेला हा सुपारी संघामुळे स्थानिक लोकांनासुद्धा मोठा रोजगार प्राप्त झाला आहे. मुरुड तालुक्यातील सुपारीचे पीक घेणार्‍या बागायतदारांना चांगला भाव मिळवून देण्याचे काम सुपारी संघातर्फे होत असल्याने नवीन चेअरमन कोण बनणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले आहे. या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे प्रवीण चौलकर, विकास दिवेकर व नरेश पाटील हे निवडून आले आहेत.

Exit mobile version