एकदिवसीय सामन्यांवर चाहत्यांची नजर; न्यूझीलंड विरूद्ध मालिकेची प्रचंड क्रेज
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
रोहित शर्मा आणि विराट कोहली हे फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळत आहेत. इंग्लंड दौऱ्यानंतर भारताची एकदिवसीय मालिका झालेली नाही. त्यातच आता भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी मैदानावर उतरणार आहे. त्यामुळे दोघांचेही चाहते या दोघांना मैदानावर खेळताना पाहण्यासाठी उत्सूक आहेत. त्यामुळे अगामी टी-20 मालिकेपेक्षा रोहित शर्मा व विराट कोहली यांना खेळताना पाहण्याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागली आहे. त्यातच चाहत्यांमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेची प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. या मालिकेसाठी आतापर्यंत 50 हजारांपेक्षा अधिक तिकिटे विकली गेली आहेत.
रोहित शर्मा आणि विराट कोहली हे फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळत आहेत. मात्र, अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावर दि.27 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर या कालावधीत 3 एकदिवसीय व 5 टी-20 सामने खेळणार आहे. याच दरम्यान श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारताचा टी-20 संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकासाठी खेळणार आहे. मात्र, ही मालिका रोहित व विराट यांच्या चाहत्यांसाठी खास असणार आहे. विंडीजविरुद्धच्या मालिकेनंतर लगेचच भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. यावेळी भारत तब्बल सहा वर्षांच्या कालावधीनंतर न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. त्यामध्ये 5 एकदिवसीय, 5 टी-20 व 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या दौऱ्याचा कालावधी दि.22 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर असा असणार आहे. रोहित व विराटचा हा कदाचीत शेवटचा न्यूझीलंड दौरा असू शकतो. त्यामुळे 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका 5 सामन्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. दरम्यान, चाहत्यांमध्ये भारत विरूद्ध न्यूझीलंड दौऱ्याचा प्रचंड क्रेझ दिसून येत आहे. यामध्ये तिन्ही प्रकारचे सामने खेळले जाणार असून, चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह निर्माण झाला आहे. न्यूझीलंड क्रिकेटनेही याचा पुरावा दिला. त्यांनी सांगितले की, तिन्ही फॉरमॅटमधील या मालिकेसाठी आतापर्यंत 50 हजारांपेक्षा अधिक तिकिटे विकली गेली आहेत.
त्यानंतर पुढील तिन्ही मालिका या घरच्या मैदानावर खेळवल्या जाणार आहेत. श्रीलंका, झिम्बाब्वे व ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. यावेळी श्रीलंकेचा संघ दि.13 ते 27 डिसेंबर या कालावधीत भारत दौऱ्यावर 3 एकदिवसीय व 3 टी-20 सामने खेळणार आहे. झिम्बाब्वेचा संघ पुढील वर्षी 3 एकदिवसीय सामन्यांसाठी दि.3 ते 9 जानेवारीमध्ये भारतात असणार आहे.
50,000 तिकीटांची विक्री
न्यूझीलंड क्रिकेटने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले की, विक्रीच्या पहिल्या आठवड्यात विक्रमी प्रतिसाद मिळाल्यानंतर, आतापर्यंत 50,000 हून अधिक तिकिटांची विक्री झाली आहे. दोन आठवड्यांच्या ‘प्री-सेल’ (पूर्व-विक्री) कालावधीनंतर सोमवारी (दि.7) सर्वसामान्यांसाठी तिकिटांची विक्री सुरू झाली. अनेक सामन्यांची तिकिटे पूर्णपणे विकली जाण्याच्या मार्गावर आहेत; त्यामध्ये क्राइस्टचर्च येथे होणाऱ्या भारत विरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्याचाही समावेश असून, त्याची 75 टक्के तिकिटे आधीच विकली गेली आहेत.
