हिरवळ महाविद्यालयात पर्यावरणपूरक गणेशोत्सव

| माणगाव | वार्ताहर |

हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, महाड व हिरवळ रात्र महाविद्यालय, महाड आणि रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्ट, महाड यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही महाविद्यालयाच्या प्रांगणात लाडक्या बाप्पाचे ढोलताशांच्या गजरात, लिझिमच्या तालावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावर्षी विद्यार्थ्यांनी लाडक्या बाप्पासाठी पर्यावरणपूरक साहित्य वापरून सुंदर अशी भारताच्या यशस्वी चांद्रयान मोहिमेची प्रतिकृती तयार करून आरास सजवली होती. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जगदीश वर्तक, प्रदीप शेठ, संतोष बुटाला, सुदेश कदम उपस्थित होते.

या गणेशोत्सवामार्फत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्टचे प्रदीप शेठ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून उत्सव पर्यावरणस्नेही बाप्पाचा, संकल्प समृध्द वसुंधरेच्या रक्षणाचा पूजेतील निर्माल्य नैसर्गिक जलस्त्रोतात विसर्जित करू नये, तर ते मंगल कलशात जमा करूया असे विविध प्रकारचे जनजागृतीपर संदेश देऊन विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आवाहन केले.

Exit mobile version