| माणगाव । वार्ताहर ।
हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, महाड महाविद्यालयात विज्ञान विभागातर्फे 37 व्या ओझोन दिवसाचे औचित्य साधुन पिपिटी प्रेझेंटेशन चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमअंतर्गत विज्ञान विभागाच्या विद्यार्थी व शिक्षकांनी मॉन्ट्रियल प्रोटोकॉल 35 या थीमसह ओझोन थराच्या जतनासाठी ओझोन थरावर दुष्परिणाम करणारे घटक व ओझोन थर संवर्धनाचे उपाय या विषयावर पिपिटी प्रेझेंटेशन सादर करून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. हिरवळ संस्थेचे अध्यक्ष किशोर धारिया संचालिका सोनाली धारिया, डॉ. संध्या कुलकर्णी यांचे पर्यावरणपूरक उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन असते. महाविद्यालयाचे प्राचार्य सुदेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.