हिरवळ महाविद्यालयात इको फ्रेंडली गणेशोत्सव

| माणगाव | प्रतिनिधी |

गणेशोत्सवाचे औचित्य साधत हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट कॉलेज ऑफ सायन्स (कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), महाड येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाविद्यालयाच्या प्रांगणात लाडक्या बाप्पाचे ढोलताशांच्या गजरात, लिझिमच्या तालावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावर्षी विद्यार्थ्यांनी लाडक्या बाप्पासाठी पर्यावरणपूरक म्हणजेच इको-फ्रेंडली साहित्य वापरून सुंदर अशी बार्बाडोसमधील केन्सिंगटन क्रिकेट ग्राऊंडची प्रतिकृती तयार करून आरास सजवली आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य सुदेश कदम उपस्थित होते. सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थित बाप्पाच पूजन व आरती जल्लोषात करण्यात आली.

Exit mobile version