यशवंती बचत गटाचे पर्यावरणपूरक आकाश कंदील

नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील नेरळ मोहाचीवाडी येथील यशवंती महिला बचत गटाने पर्यावरणपूरक आकाश कंदील बनवले होते.त्यातील 25 पर्यावरणपूरक आकाश कंदील रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी खरेदी केले असून सर्वांनी बचत गटांनी बनवलेल्या वस्तू खरेदी करून त्यांना व्यवसाय मिळवून देण्याचा देण्याचा संकल्प ट्विट करून बोलून दाखवला आहे.
नेरळ ग्रामपंचायत मधील मोहाचीवाडी येथील यशवंती महिला बचत गटाच्या माध्यमातून दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील पर्यावरणपूरक आकाश कंदील आणि फराळ बनविला होता.कपड्याच्या धाग्यापासून बनवलेल्या आकाश कंदील हे पर्यावरणपूरक असल्याची नोंद वृत्तपत्रांनी घेतली होती. वेगवेगळ्या प्रकारचे आकाश कंदील,पणत्या यांची माहिती पाहून रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे खुश झाल्या.आपल्या जिल्ह्यातील महिला स्वयंसहायता गटांना चालना देण्याचा प्रयत्न करणार्‍या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी नेरळ मधील वर्षा बोराडे यांच्या माध्यमातून यशवंती महिला बचत गटाने बनवलेले पर्यावरण पूरक आकाश कंदील यांचे कौतुक केले.मात्र पालकमंत्री या यशवंती महिला बचत गटाची कौतुक करून थांबल्या नाहीत,तर त्यांनी दिवाळी सणासाठी तब्बल 25 आकाश कंदील खरेदी करून आपल्या घरी मागवून घेतले. यशवंती महिला बचत गटाला पालकमंत्री यांच्याकडून आकाश कंदील यांची मागणी येताच रात्रीचा दिवस करून कंदील बनवले आणि पालकमंत्री यांच्यापर्यंत ते कंदील पोहच केले.

Exit mobile version