येरळ केंद्राची शिक्षण परिषद संपन्न

। सुतारवाडी । वार्ताहर ।

केंद्र शाळा येरळची शिक्षण परिषद खरबाची वाडीवस्ती येथील प्राथमिक शाळेत केंद्रप्रमुख भागवत भुसाणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या शिक्षण परिषदेत मुख्याध्यापक अरुण शेळके यांनी संकलित चाचणी विश्‍लेषण व कृती या विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच, आढावा व चर्चा सत्र या विषयावर नागेश सुतार तर पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन मुख्याध्यापक बादल जाधव यांनी केले. भागवत भुसारे यांनी प्रशासकीय कामकाजाविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खरबाची वाडी शाळेचे मुख्याध्यापक अमोल राठोड यांनी केले. यावेळी केंद्रातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षण परिषदेस उपस्थित होते.

Exit mobile version