| रायगड । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे मंगळवारी (दि. 3) उपशिक्षक समायोजन प्रक्रिया आयोजित करण्यात आली. सकाळी दहा वाजता ही प्रक्रिया सुरू होणार होती. परंतु, अधिकारी आणि पदाधिकारी समायोजन प्रक्रिया असणाऱ्या ठिकाणी तब्बल अडीच तास उशिरा पोहोचले. यामुळे समायोजनासाठी आलेल्या शिक्षकांना ताटकळत बसावे लागले होते. भर उन्हाचा तडाखा असल्याने आलेल्या शिक्षकांनी झाडाच्या सावलीचा आधार घेतला होता. दहा वाजता सुरू होणारी बैठक साडेबारा वाजता सुरू झाली तेव्हा आलेल्या शिक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी हायसे सोडले.
शिक्षण विभागाची समायोजन प्रक्रिया अडीच तास विलंबाने
