शिक्षण ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली

माजी आ. पंडित पाटील याचे प्रतिपादन
। पेझारी । वार्ताहर ।
शिक्षणाने व्यक्तीचा व्यक्तिगत व सामाजिक विकास साधला जातो म्हणून विद्यार्थ्यांनी मनापासून अभ्यास करावा त्याचबरोबर सहशालेय उपक्रमात भाग घेऊन आपले कर्तृत्व सिद्ध करावे, असे प्रतिपादन को. ए. सो. ज्येष्ठ संचालक, माजी आ. पंडित पाटील यांनी को. ए.सो.ना.ना.पाटील पोयनाड संकुलाच्या वार्षिक स्नेहसंमेलन उद्घाटन सोहळ्या प्रसंगी अध्यक्षीय भाषणातून केले. ते पुढे म्हणाले की, या खारेपाट विभागाचा शैक्षणिक विकास स्वर्गीय ना.ना. पाटील, लोकनेते अ‍ॅड. दत्ता पाटील व भाऊ प्रभाकर पाटील यांच्यामुळे झाला. त्यांच्या पुढील पिढ्याही शिक्षण क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत. त्यांच्यामुळेच आज अलिबाग तालुका जिल्ह्यात इतर तालुक्यांपेक्षा सर्वच क्षेत्रांमध्ये प्रगतीपथावर आहे,याचा विसर विद्यार्थी आणि पालकांनी पडू देऊ नका असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.

को. ए. सो. ना. ना. पाटील पोयनाड संकुलाचा वार्षिक स्नेहसंमेलन २०२२-२३ चा उद्घाटन सोहळा १४ डिसेंबर रोजी आंबेपूर सरपंच सुमना पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने होऊन नंतर चित्रकला, रांगोळी, विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पुढे संगीत कलापथकाने, संगीत शिक्षक राजेंद्र मात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संकुलप्रमुख प्रा. कमलाकर फडतरे यांनी केले. यावेळी उपस्थित को.ए.सो.सह मुख्यकार्यकारी अधिकारी अशोक गावडे सर व मॉर्निंग वॉक ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे यांनी आपल्या मनोगत पर भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी अहवाल वाचन व सूत्रसंचालन सायली पाटील यांनी केले तर आभार तुकाराम बर्गे यांनी मानले.

सदर कार्यक्रम प्रसंगी शाळा समिती सदस्य यशवंत पाटील, धारिणी भगत, राऊत, शिक्षणप्रेमी प्रभाकर भगत, श्रीकांत पाटील, पांडुरंग पाटील, मोहन मंचके, अनिल पाटील, शिरीष पाटील, शैक्षणिक संकुलातील शाखांचे प्रमुख डॉ. दिलीप पाटील, ललिता पाटील, संतोष्वरी मठपरती, संगीता माने तसेच सत्रप्रमुख एस.के.पाटील, संध्या खरसंबळे, स्नेहसंमेलन कार्याध्यक्षा तृप्ती पिळवणकर, उपकार्याध्यक्ष देवेंद्र पाटील तसेच संकुलातील सर्व शाखांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, एनसीसी, आर एस पी, गाईड पथके तसेच आजी-माजी विद्यार्थी असा मोठा समुदाय उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी परिश्रम घेतले.

Exit mobile version