| खांब | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील प्राथमिक शाळा वाशी या शाळेस जिल्हा शिक्षणाधिकारी दहितुले यांनी सदिच्छा भेट देऊन शालेय कामकाजाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. रा.जि.प. आदर्श प्रा. शाळा वाशी जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी दहितुले यांनी रोहा तालुक्यातील शैक्षणिक कामकाजासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या दौऱ्यादरम्यान त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत विस्ताराधिकारी काकडे, तालुका गट शिक्षणाधिकारी मेघना धायगुडे, केंद्रप्रमुख नारायण गायकर उपस्थित होते. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांची प्रगती, शाळेत संपन्न होणारे विविध उपक्रम, शाळेबद्दल आणि शिक्षकांच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच शाळा व्यवस्थापन समिती आणि माजी विद्यार्थी संघाचे लाभत असलेल्या उत्तम सहकार्याचे कौतुक केले.
शिक्षणाधिकाऱ्यांची वाशी शाळेस भेट
