। खांब । वार्ताहर ।
रायगड पोलीस आयोजित रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत माझी शाळा सुरक्षित शाळा या अभियान अंतर्गत रोह्यातील कोएसो मेहेंदळे हायस्कूल रोहा या शाळेचा सुरक्षित शाळा म्हणून विशेष गौरव करण्यात आला आहे.
स्टुडंट्स ऑफ रोड सेफ्टी सन्मान सोहळा रिलायन्स टाऊनशिप नागोठणे येथील बालगंधर्व रंगभवन सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी शिक्षणाधिकारी मोटार वाहन विभाग प्रमुख अपर पोलीस निरीक्षक रायगड व सर्व विद्यालयाचे पदाधिकारी तसेच रिलायन्सचे पदाधिकारी यांच्यासह मेहेंदळे हायस्कुल प्रा.मोसे, शिक्षक प्रतिनिधी सत्र प्रमुख नारायण पानसरे, लोहकरे, गावित आदी उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील 500 शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले होते.त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील 107 वर्षांची परंपरा लाभलेल्या कोएसो मेहेंदळे हायस्कूलला सुरक्षित शाळा म्हणून गौरविण्यात आले.