साखरेतील शिक्षण सप्ताह उत्साहात

। अलिबाग । वार्ताहर ।

अलिबाग तालुक्यातील साखर येथील रायगड जिल्हा परिषद शाळेत दि.22 ते 28 जुलै या कालावधीत शिक्षण सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. त्यामध्ये अध्ययन अध्यापन साहित्य बनवणे, क्रिडा स्पर्धा, पारंपरिक वेशभूषा, मातीकाम व कापडी पिशव्या बनवणे, वृक्षारोपण आणि समुदाय सहभागांतर्गत स्नेह भोजन असे विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी राम अवतार व शिव अवताराची पारंपारीक वेशभुषा सादर केली होती. तसेच, शाळेतील परिसरात विविध रोपांची लागवड करण्यात आली. हा कार्यक्रम राबविण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तेजस तांडेल, सदस्य देवदत्त मुंढे, हरेश्‍वर गोतकर तसेच उपसरपंच आनंद बुरांडे, सदस्य विनायक पाटील व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक, मुख्याध्यापक राजेंद्र पाटील, उपशिक्षिका स्मिता चिखले यांनी विशेष प्रयत्न केले.

Exit mobile version