| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात मुस्लिम बांधव व पोलीस अधीक्षक रायगड यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार ईद-ए-मिलादनिमित्ताने सोमवार, दि.16 सप्टेंबर रोजी राज्य शासनाने जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवण्यात आली आहे.
राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सोमवार, दि. 16 सप्टेंबर रोजी दर्शविण्यात आलेली सार्वजनिक सुट्टी रायगड जिल्ह्यामध्ये नवीन अधिसूचनेद्वारे कायम ठेवण्यात आली आहे. याची सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांनी आणि संबंधितांनी नोंद घ्यावी, असे उपजिल्हाधिकारी डॉ. रवींद्र शेळके यांनी कळविले आहे.